#ICCWorldCup2019 : सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर 12 धावांनी विजय

स्टीव्ह स्मिथचे शानदार शतक

साउथम्पटन – विश्‍वचषक स्पर्धेतील तिसऱ्या सराव सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध स्टीव्ह स्मिथ याने शानदार शतक झळकावित ऑस्ट्रेलियाला 297 धावांपर्यत मजल मारुन दिली. प्रत्युत्तरात इंग्लंडला निर्धारित 49.3 षटकांत सर्वबाद 285 धावांपर्यतच मजल मारता आली. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 12 धावांनी विजय मिळविला.

298 धावांचा पाठलाग करताना जेम्स विन्स (64) आणि जोस बटलर (52) यांनी अर्धशतकीय खेळी केली. परंतु अन्य फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने इंग्लंडचा डाव 49.3 षटकांत 285 धावांवर गुंडाळला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. पण फिंच 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर (43) आणि मार्श यांनी 30 धावांची खेळी करत 100 धावांच्या समीप नेले. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथने संघाची धुरा आपल्या हाती घेतली. त्याने 102 चेंडूत 116 धावांची खेळी केली. त्यानंतर उस्मान ख्वाजा (31) आणि ऍलेक्‍स कॅरी (30) यांनी संघाला 50 षटकांत 9 बाद 297 धावांपर्यत मजल मारून दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.