‘जगनमोहन रेड्डी -नरेंद्र मोदी’ भेट; चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात

नवी दिल्ली – २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएतील बहुतांश घटकपक्षांनीही दमदार कामगिरी केली. एनडीएतील घटक पक्षांनी काल मोदींनी आपल्या नेतेपदी निवड केली आहे. दरम्यान, एनडीएचा विस्तार होऊन भाजपाला अजून एक मित्रपक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वृत्त संस्थेच्या माहितीनुसार आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीचा दारुण पराभव करून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी आज नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी या भेटीनंतर राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधान आलं आहे. यांच्यात केवळ 15-20 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते आहे. पण भेटीत नेमकी काय चर्चा झाली , हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभेमध्ये भक्कम बहुमत पाठीशी असलेल्या एनडीएचा अजून विस्तार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी आज दिल्ली येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर जगनमोहन रेड्डींनी अमित शहांचीही भेट घेतल्याने ते एनडीएमध्ये प्रवेश करणार का याची चर्चा सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.