नवी दिल्ली: निवडणूकीत खर्चाची मर्यादा ओलांडल्याने अभिनेते आणि गुरुदासपूरचे नवनिर्वाचीत भाजपचे खासदार सनी देओल यांची खासदारकी अडचणीत आली आहे. याबाबत आयोगाने त्यांना नोटीस बजावली असून खुलासा मागविला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादा 70 लाख एवढी घालून दिली आहे. देओल यांच्या खर्चाचा जो अहवाल आयोगाला सादर करण्यात आला आहे त्यात त्यांचा खर्च हा 86 लाखांपेक्षा जास्त झाला असल्याचे आढळून आला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाला जो अहवाल मिळाला आहे, तो चुकीचा असल्याचे देओल यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या खर्चाचा योग्य अहवाल लवकरच सादर करू, असे सांगण्यात आले आहे. देओल यांनी खर्च जास्त केल्याचे आढळून आल्यास आयोग त्यांच सदस्यत्व रद्द करून दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषीत करू शकते.