#LIVE: मुख्यमंत्री कोण ही चर्चा माध्यमांना करू द्या, आपण विकासासाठी काम करू- मुख्यमंत्री

मुंबई: शिवसेनेचा 53 वा वर्धापनदिन शीव येथील षण्मुखानंद सभागृहात होत आहे. या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. आज शिवसेनेने त्यांचे मुखपत्र सामनातून “भाजपशी ‘युती’ जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू व शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल. चला, याच निर्धाराने कामाला लागूया!, असे शिवसेनेने मुखपत्र सामनातुन स्पष्ट केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

#LIVE UPDATE 

 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले स्वागत
 • महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या भाषणाला सुरुवात
 • शिवसेना ताठ कण्याणे आणि ताठ मानेने राज्यासह देशभरात खंबीरपणे उभी आहे
 • मराठी माणसाला सन्मानाने जगण्यासाठी आणि हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा शिवसेनाप्रमुखांनी दिली
 • राज्य सरकार आणि महापालिका जनतेच्या विकासासाठी काम करत आहे.
 • पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत आहे
 • शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सत्कार
 • शिवाजीराव अढळराव पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पाटील यांचा सत्कार

 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरुवात
 • मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचा माठे भाऊ असा केला उल्लेख
 • उद्धवजींना मला बोलावताना आणि मला आमंत्रण स्वीकारताना प्रश्न पडले नाही, मात्र, इतरांना ते पडतात
 • शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद घेण्यासाठी, उद्धव ठाकरे यांचे प्रेम मिळवण्यासाठी आणि शिवसैनिकांची उर्जा मिळवण्यासाठी आपण या कार्यक्रमाला आलो आहोत
 • सर्वात जास्त काळ एकत्र असलेली युती आहे.
 • काही काळ तणाव होता, मात्र, मतभेद दूर करून जनतेच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
 • विरोधकांनी कितीही आघाड्या केल्या तरी राज्यात वाघ आण सिंहाचेच राज्य येणार आहे
 • वसेनेच्या कार्यक्रमात आल्यावर घरी आल्यासारखे वाटते, आपण भगव्या ध्वजासाठी लढणारे आपण आहोत
 • आमचे हिंदुत्व संकुचित नाही, आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे, प्रत्येक जातीचे, भाषेचे याला बंधन नाही
 • राष्ट्र मोठे करण्यासाठी महाराष्ट्राला मोठे करायला हवे, त्यासाठी आपण काम करत आहोत.
 • आम्ही निवडणुकांसाठी नाही, तर राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत.
 • या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांचे मानले आभार
 • पक्षाच्या वर्धापनदिनाला दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला बोलावण्याची ही ऐतिहासीक घटना आहे.

 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
 • संघर्षाशी मुकाबला करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांना साथीदार दिले आहेत.
 • आनंदाच्या क्षणी शिवसेनाप्रमुखांची आठवण होते.
 • प्रत्येक शिवसैनिक प्रेम करताना जीव लावतो, तर लढताना जीवही देतो
 • युती करतानाची भावना महत्त्वाची आहे, भावनेशिवायच्या युतीला अर्थ नाही
 • आमचा वाद सत्तेसाठी नव्हता, जनतेच्या समस्यांसाठी होता
 • मुख्यमंत्री आणि अमितश शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर समस्या सोडवण्याचे काम सुरू झाले
 • समस्या सोडवल्यानंतर कशाला भांडायचे, आता विरोधीपक्षच नाही
 • आता वेडात मराठे सात नाही, तर एकसाथ दौडणार आहेत
 • आता युती झाली आहे. मैदान साफ आहे, त्यामुळे पायात पाय अडकण्याचा धोका असतो
 • मोदी यांचे सरकार आल्याने आता राममंदिर झालेच पाहिजे
 • काहीजण याबाबत शंका उपस्थित करत आहेत, सरकारचे काम तर सुरु होऊ द्या
 • काही काम करायची आहोत, याचा आमचा निर्णय झाला आहे.
 • यापुढे युतीत वाद होणार नाहीत, याची आम्ही काळजी घेतली आहे.
 • स्वातंत्र्यवीर सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्या नालायकांचा पराभव झाला आहे
 • “ज्या एका भावनेने युती आपण त्या वेळेला केली होती ती आजही त्याच भावनेने केली आहे.”
 • “संजय दादांच्या कोल्हापूरच्या सभेत एक चांगलं वाक्य केलं होतं, ‘आमचं ठरलंय!’ आणि आता आमचं पण ठरलंय!”
 • “कलम ३७० आम्ही काढणार म्हणजे काढणारच, काश्मीर वर आमच्या देशाचा हक्क आहे.”
 • ओवैसी हिंदूचा अपमान करत असताना आम्ही गप्प बसणार नाही

Leave A Reply

Your email address will not be published.