भारताच्या संरक्षण सामग्री निर्यातीत दुपटीने वाढ

आगामी काळात परकीय चलन उपलब्ध होणार

नवी दिल्ली – भारताच्या संरक्षण सामग्री निर्यातीत दुपटीने वाढ झाली असून ती 11 हजार कोटींच्या जवळ पोहोचली आहे. निर्यातीबाबत तयार करण्यात आलेल्या धोरणांमध्ये आलेली सुलभता आणि कंपन्यांच्या अधिक ऑफसेट प्रोजेक्‍ट्‌समुळे अमेरिकेतील बाजारात मिळालेल्या प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर भारताची संरक्षण सामग्री निर्यात दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. यामुळे बरेच परकीय चलन मिळणार आहे.

साल 2017-18 मध्ये भारताची संरक्षण सामग्री निर्यात 4 हजार 682 कोटी रुपये होती. 2018-19 मध्ये वाढून ती 10 हजार 745 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, भारतीय कंपन्यांना ठराविक देशांना संरक्षण सामग्रीची निर्यात करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक नवा जनरल एक्‍सपोर्ट लायसन्स प्लान तयार केला आहे. भारताच्या संरक्षण सामग्री निर्यातीत सर्वात मोठा वाटा अमेरिकेचा आहे.

अमेरिकेत 5 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्रीची निर्यात केली जाते. अमेरिकेनंतर भारत इस्रायल आणि युरोपियन युनियनला सर्वाधिक संरक्षण सामग्री निर्यात करतो. काही धोरणांमध्ये बदल केल्यानंतर संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत मोठी वाढ झाल्याची माहिती काही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×