लंडन – धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला गवसलेला सूर ही ऑस्ट्रेलियासाठी आत्मविश्वास उंचावणारी बाजू आहे. दोन सामने पावसामुळे धुतले गेल्यामुळे श्रीलंकेचा संघ त्यांच्याविरूध्द विजय मिळविण्यासाठी चिवट प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे.
आज विश्वचषक स्पर्धेमध्ये लंडन येथील ‘द ओव्हल’ मैदानावर थोड्याच वेळात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यास सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूने लागला आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करूणारत्ने याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत ऑस्ट्रेलिया संघास फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
Sri Lanka win the toss and will bowl first at The Oval! pic.twitter.com/WJMdk6NfuK
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 15, 2019
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चार लढतींमधील तीन लढती जिंकल्या आहेत. मात्र, त्यांना भारताकडून पराभवाची चव चाखावयास मिळाली आहे. श्रीलंकेपेक्षा त्यांचे पारडे जड असले तरीही सामन्यास कलाटणी देण्याबाबत श्रीलंकेची ख्याती आहे. हे लक्षात घेतले तर ऑस्ट्रेलियास आज सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ –
डेविड वार्नर, ऐरन फ़िंच, उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ, ग्लेन मैक्सवेल, शॉन मार्श, एलेक्स कैरी, जेसन बेहरनडोर्फ़, पैट कमिन्स, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन
श्रीलंका संघ –
दिमुथ करुणारतने, कुसल परेरा, लाहिरु थिरिमाने, कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, धनंजया डी सिल्वा, थिसारा परेरा, इसुरू उदाना, सिरिवर्द्धना, लसिथ मलिंगा, नुवान प्रदीप