सातारा – नीरा-देवघर पाणी प्रश्नावरून मागील काही दिवसांपासून साताऱ्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसलेंची तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी केली होती. या वक्तव्याचा निषेध करत उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांनी रामराजे नाईक निंबाळकरांचा पुतळा जाळला.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या भेट घेऊन “खासदार उदयनराजेना तुम्ही सांभाळणार असाल तर आम्हाला पक्षातून बाहेर पडण्याची परवानगी द्या,’ असे स्पष्ट ठणकावून सांगणार आहे, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारी म्हंटले आहे.