सराव सामन्यात भारताचा अर्जेंटिनावर दणदणीत विजय

भुवनेश्‍वर – हॉकी विश्‍वचषक 2018 स्पर्धेपूर्वी झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताने 2016 रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा 5-0 ने धुव्वा उडवला. भारताकडून हरमनप्रीत सिंह, ललित उपाध्याय, दिलप्रीत, निलकांत शर्मा आणि हार्दिक सिंह यांनी गोल झळकावले असून आगामी विश्‍वचषकासाठी भारतीय संघाने जोरदार सराव सुरु केला आहे. आज भारत स्पेनविरुद्ध आपला दुसरा सराव सामना खेळणार आहे.

भारताने झळकावलेल्या 5 गोलपैकी पहिला आणि तिसरा गोल हा पेनल्टी कॉर्नरवर झळकावण्यात आला होता, बाकीचे 3 गोल हे मैदानी गोल नोंदवले गेले. भारतीय संघाने केलेल्या अष्टपैलू कामगिरीचं प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी कौतुक केले.

मधल्या काळात भारताने सामन्यावर आपले नियंत्रण गमावले होते, यादरम्यान अर्जेंटिनाने दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. विश्‍वचषकासारख्या स्पर्धेत अशा चुका करणे भारताला महाग पडू शकते असे मत हरेंद्रसिंह यांनी व्यक्त केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)