पुणे – येथे सुरू असलेल्या मार ओस्थाथिओस निमंत्रित हॉकी स्पर्धेत प्रभाकर अस्पात आणि रोव्हर्स अकादमी संघांत अंतिम लढत रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात अस्पात अकादमीने विक्रम पिल्ले अकादमी संघाचा 6-4, तर रोव्हर्स अकादमी संघाने एक्सलन्सी अकादमी संघाचा 3-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत राहुल आणि आदित्य रसाळ बंधूंनी नोंदविलेल्या गोलने रोव्हर्सचा विजय सुकर झाला. राहुलने दोन, तर आदित्यने एक गोल केला. एक्सलन्सी संघाकडून एकमात्र गोल सौरभ पाटिलने केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोव्हर्स अकादमीने प्रारंभीपासूनच आक्रमक खेळी केली. या सामन्यावर वर्चस्व मिळवित रोव्हर्सने 3-1 असा विजय नोंदवित आगेकूच कायम ठेवली.