आईच्या वाढदिवसासाठी ती बारा तासात परतली

प्रियांका मोहितेच्या विक्रमाचा असाही हळवा कोपरा

आईच्या डोळ्यात तरळले अश्रू

प्रियांकाचा रात्री साताऱ्यात फोन येताच आई शोभा मोहिते यांना आनंदाश्रू दाटून आले. लेक आईच्या ओढीने हिरकणीसारखा भीमपराक्रम करून अवघ्या बारा तासात माघारी परतली याचा प्रचंड अभिमानही वाटला. आई वाढदिवसाच्या शुभेच्छा हे प्रियांकाचे शब्द ऐकताच ही माऊली पण धन्य झाली. काळजी आणि चिंता करणाऱ्या शोभा वहिनींना लेकीच्या पराक्रमानं आता आभाळ ठेंगणं झाल आहे.

सातारा – साताऱ्याची शिखर कन्या प्रियांका मोहिते आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मकालूच्या टॉप रेंजवरून अवघ्या बारा तासात बेस कॅम्पला परतली. आईला फोनवरून शुभेच्छा दिल्यानंतरच तिने मोकळा श्‍वास घेतला. जागतिक विक्रम करणाऱ्या लेकीच्या भरभरून शुभेच्छा मिळाल्यानंतर शोभा मंगेश मोहिते या माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.

मकालू ते हिमालय बेस कॅंप हे अंतर तब्बल बावीस तासाचे मात्र बुधवारी मकालूच्या शिखरावर सकाळी सव्वानऊ वाजता पाय ठेवत प्रियांका मोहिते या साताऱ्याच्या लेकीने जगातील सर्वात कमी वयाची आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक म्हणून मान मिळवला व जागतिक विक्रमाची नोंद केली. मात्र माघारीच्या प्रवासातही प्रियांकाच्या एका विक्रमाचा आवर्जून उल्लेख करावा लागला.

काठमांडू नजीकच्या हिमालयीन बेस कॅम्पवर प्रियांका अवघ्या बारा तासात म्हणजे त्याच दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास पोहचली. पायात मोठे स्क्रॅंप शूज सोबत ऑक्‍सिजन यंत्रणा अशाही अवस्थेत प्रियांका चिकाटीने माघारीचा रस्ता कापत राहिली आणि बारा तासात बेस कॅपला पोहचून प्रियांकाने आपल्या शारीरिक व मानसिक कणखरतेचा परिचय दिला. पायोनियर ग्रुपच्या इतर अनुभवी शेर्पाना बेसवर पोहचायला बावीस तास लागले. अतिश्रमाने थकलेल्या प्रियांकाने धावतपळत सॅटेलाईट फोनचा ताबा घेत वडिल मंगेश मोहिते यांना साताऱ्यात फोन लावला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)