नगर: एसटी बसमधून खाली उतरत असलेल्या विद्यार्थिनीच्या बॅगची चेन उघडून त्यातील सात हजार रुपयांचे साहित्य व कागदपत्रे चोरून नेली. माळीवाडा बसस्थानकात ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, संचिता गोविंद ढेरे (वय 23, रा. आरडगाव, ता. राहुरी) ही विद्यार्थिनी बी.एड्. प्रवेश परीक्षेसाठी बसमधून नगरला आली.
माळीवाडा बसस्थानकात एसटी बसमधून खाली उतरत असताना कोणीतरी तिच्या बॅगची मागील बाजूची चेन उघडून रोख रक्कम, मोबाईल हॅंडसेट, मतदान कार्ड, एटीएम कार्ड आदी विविध कागदपत्रे असा एकूण सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.