वडूज – गेली चार वर्षे सामाजिक कामात अग्रेसर असणारी सिद्धेश्वर कुरोली येथील सारथी सामाजिक विकास संस्थेमार्फत सारथी हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत यावर्षी गंगणबावडा, महाबळेश्वर, माण, खटाव, पाटण या सर्व तालुक्यात असणाऱ्या दुर्गम भागातील प्राथमिक आणि माध्यमिक मिळून पंधरा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
गेली तीन वर्ष सारथी सामाजिक विकास संस्था सारथी हात मदतीचा हा उपक्रम राबवत आहे. यावषी सारथीने पंधरा शाळेतील मिळून 391 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग, प्रत्येक विद्यार्थ्यास 6 वह्या, कंपास पेटी व त्यातील साहित्य, तसेच चित्रकला वही, रंगपेटी आदी वस्तूंचा समावेश होता.
कोल्हापूऱ जिल्हयातील गगनबावडा तालुका पाटीलवाडी, महाबळेश्वर तालुका येथील वारसोली देव, माण तालुक्यातील सत्रेवाडी, तेलदरा, माणगंगानगर, बोडके, शेरेवाडी, खताळवस्ती, खटाव तालुक्यातील बुधावलेवाडी, नांदोशी, मेघलदरवाडी, आवारवाडी, सि. कुरोली आदी गावातील मिळून पंधरा शाळेतील एकूण 391 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात प्रमुख म्हणून संतोष पाटोळे, नितीन जाधव, गुरू प्रसाद गोसावी, यांनी जबाबदारी पार पडली.