प्रियांका आणि निकने घेतला कुकिंग क्‍लास

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा अमेरिकन गायक पती निक जोनास यांनी इटलीमध्ये आपल्या डेटचा एक भाग चक्क कुकिंग क्‍लास आयोजित केला होता. निकने या डेट नाईटचे काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये निकने “अजबसी डेट नाईट कुकिंग’ असेही लिहीले आहे.

यातल्या एका व्हिडीओमध्ये प्रियांका एका हातात वाईनचा ग्लास धरून दुसऱ्या हाताने स्टोव्हवरच्या पॅनमध्ये घातलेले पास्ता सॉस चमच्याने ढवळताना दिसते आहे. तिला नक्की काय करायचे आहे, हे माहिती नाही. पण तिचा प्रयत्न मात्र नेटाने चालला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या व्हिडीओमध्ये प्रियांका “मला कुकिंग येतच नाही.’ असे म्हणतानाही ऐकू येते आहे. जर तिला शिकवण्यासाठी एखादा शेफ तयार असेल तर आपल्याला कुकिंग जमू शकेल, असेही प्रियांका म्हणते. निक बरोबर असल्यामुळे आपल्याला बरे वाटते आहे. कारण किमान आपण करत असलेल्या प्रयत्नांना तो साक्षीदार तरी राहिल, असेही प्रियांका म्हणते. तिच्या कुकिंगच्या प्रयत्नांना निककडून चांगले प्रोत्साहन मिळते आहे. प्रियांकाकडून तो देखील कुकिंगच्या टिप्स घेत असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)