एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा

ठाणे – एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. प्रदीप शर्मा सध्या ठाणे क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत होते. प्रदीप शर्मा 2008 मध्ये पोलीस दलातून निलंबित झाले होते. नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑगस्ट 2017 मध्ये ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.

या राजीनाम्यानंतर प्रदीप शर्मा राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. लवकरच्या ते शिवसेनेत प्रवेश करतील.

पोलीस दलात 1983 साली दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द कायम वादात राहिली. ऐंशी-नव्वदच्या दशकात मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांनी हातपाय पसरले असताना, अंडरवर्ल्ड राज संपवण्यासाठी पोलिसांनी एन्काऊंटर मोहिम हाती घेतली होती.

प्रदीप शर्मा यांनी 312 एन्काऊंटरमध्ये भाग घेत 100हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केले आहे. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध या आरोपातून शर्मा यांना 2008मध्ये पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. लखन भय्या एन्काऊंटर प्रकरणी शर्मा यांच्यासह 13 जणांना अटकही करण्यात आली. मात्र 2013 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपांतूनही त्यांची मुक्तता झाली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)