अलाहबाद उच्च न्यायालयाची बजाविली नोटीस ः 21 ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित
अलाहबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज अलाहबाद उच्च न्यायालयाने नोटीस बजाविली आहे. ही नोटीस न्यायाधिश एम. के. गुप्ता यांनी बजावली असून 21 ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली आहे.
ही याचिका समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि बीएसएफचे माजी सैनिक तेजप्रताप यादव यांनी दाखल केली आहे. लोकसभा निवडणूकीवेळी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे.
वाराणसीमधून तेजप्रताप यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु निवडणूक आयोगाने सभ्य वर्तवणूकीचा दाखल न दिल्याचे अयोग्य कारण देत उमेदवारी अर्ज रद्द केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. या याचिकेची दाखल घेत उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटीस बजाविली आहे.