पीएमपीएमएल करणार स्पेअरपार्टस खरेदी

पुणे – प्रवाशांना दर्जेदार आणि सुरळीत सेवा मिळावी यासाठी स्पेअरपार्टसची खरेदी ही गरजेची बाब आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाच्या वतीने स्पेअरपार्टसची खरेदी सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रशासनाला आणि प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे. पीएमपीएमएल प्रशासनाला बसेसच्या संचलनासाठी स्पेअरपार्टस आणि टायरची दैनंदिन आणि गरजेनुसार खरेदी करावी लागत असते. त्यामुळे निधी उपलब्ध असल्यानंतर प्रशासनाच्या वतीने त्यांची खरेदी करण्यात येत असते. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी या खरेदीला बंदी घालण्यात आली होती.

विशेष म्हणजे, आचारसंहिता दोन महिन्यांहून अधिक कालावधीसाठी असल्याने ही खरेदी रखडणार होती. त्यातूनच बसेसचे संचलन बहुतांशी प्रमाणात थांबणार होते. त्याचा फटका प्रवासी सेवेला बसणार होता. ही बाब लक्षात घेऊन या खरेदीला मान्यता देण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याला आयोगाने मान्यता दिल्यानंतर आणि तसे पत्र दिल्यानंतर प्रशासनाच्या वतीने ही खरेदी सुरू केली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)