दीड लाखांची कॉपर केबल चोरी

पिंपरी – कंपनीच्या गोदामात ठेवलेली दीड लाखांची कॉपर केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना शनिवार (दि.15) चाकण नाणेकरवाडीतील रोलेक्‍स मशीनरी या कंपनीच्या गोडावूनमध्ये घडली. याप्रकरणी पराग राम शर्मा (वय 34, रा. कल्पतरु हार्मणी सी 505, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पराग शर्मा यांचा कॉपर वेल्डिग साहित्य खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी चाकण येथील रोलेक्‍स मशीनरी या कंपनीच्या गोडावूनमध्ये ठेवलेली दीड लाख रुपये किंमतीची 80 मीटर कॉपर वेल्डींग केबल चोरट्यांनी चोरुन नेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)