लांडेवाडीत एकावर कोयत्याने वार

पिंपरी -दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि.12) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भोसरीतील लांडेवाडी येथे घडली.

अशोक रामभाऊ गव्हाणे (वय 30, रा. विठ्ठलनगर लांडेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे आहे. महादेव बाजीराव खाडे (वय 30, रा. लांडेवाडी) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी अशोक व आरोपी महादेव यांच्यामध्ये रविवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन महादेव याने सायंकाळी लांडेवाडी येथून पायी चाललेल्या अशोकवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)