राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता

विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर :साळुंब्रे गावात आरोग्य तपासणीसह रक्‍तदान शिबिर, वृक्षारोपण

सोमाटणे -पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सक्षम भारत अभियान विशेष श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता मोहीम राबवून गावस्वच्छ केला. त्याच बरोबर गावात विविध कार्यक्रम राबवून गावात सेवा केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमाचे उद्‌घाटन पंचायत समिती सदस्या निकिता घोटकुले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच उज्वला आगळे, उपसरपंच अजय दवणे, ग्रामपंचायत सदस्य सगुणा राक्षे, नलिनी विधाटे, द्वारका राक्षे, समीर थोरवे, वर्षा रसखे, दिलीप विधाटे, ग्रामसेवक संभाजी दंतराव, राष्टीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत ढमके, प्रा. डॉ. इंदिरा अवसरे आदी उपस्थित होते.

दहा दिवस चाललेल्या या शिबिरात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थाची आरोग्य तपासणी केली. रक्‍तदान शिबीर, वृक्षारोपण, परसबाग स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील वनस्पती, प्राणी, आरोग्य, शेती व आर्थिक आदी बाबतचा सर्वे केला.

शेतकऱ्यांसाठी माहिती दूत नावाचे मोबाईल अप्लिकेशन त्यांच्या मोबाईलवर डाउनलोड करून देत ते कसे वापरायचे याची माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी दररोज वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. अजित इंगवले, प्रा. ऋषी दुर्गे, प्रा. सचिन जाधव आदींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहल अग्निहोत्री यांनी शिबिरास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले. संचालक डॉ. पी. डी. पाटील, विश्‍वस्त डॉ. स्मीता जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

समारोपाचे अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किरण राक्षे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी समाजकार्य करताना आपल्या गावात व परिसरातील निराधार गरजू नागरिकांना मदत करून विविध पातळीवर कार्य करावे, असे आवाहन केले. सध्याच्या तरुणांचा राजकारणाकडे अधिक ओढा दिसत आहे; परंतु राजकारणात राजयोग असल्याशिवाय काहीही घडत नाही. त्यामुळे अनेक तरुणांच्या पुढे अंधकार निर्माण होतो. यासाठी योग्य वेळी योग्य करिअरच पर्याय निवडावा, असे देखील प्रतिपादन केले.

समारोपाच्या कार्यक्रमास किरण राक्षे, कमलेश राक्षे, शामराव राक्षे, भगवान टिळेकर, मुख्याध्यापिका शोभा महाजन, महाविद्यालयाचे प्राध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन शामराव राक्षे यांनी केले. प्रा. अरविंद पाटील यांनी
आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)