पिंपरी – पेट्रोल पंप आणि दुकानासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकी चोरून नेल्याच्या दोन घटना शहरातील हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल अच्युतराव गिरी (वय 26, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गिरी हे आपली दुचाकी शिंदे पेट्रोल पंपाशेजारी लावून लघुशंकेसाठी गेले असता अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेली. तर, दुसऱ्या एका घटनेत कांतीलाल नारायण लोंढे ( वय 42, रा. साठेनगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.