भोसरी एमआयडीसीत 52 हजार रुपयांच्या केबल अज्ञाताने चोरल्या
Updated On:
भोसरी – कंपनीत कामासाठी आणलेल्या तांब आणि कांस्याच्या 52 हजार 390 रुपयांच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. ही घटना एमआयडीसी भोसरीतील प्लाझ्मा टेक्नॉलॉजिस या कंपनीत घडली.
याप्रकरणी बालाजी रघुनाथ चव्हाण (वय 43, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार (दि.6) ते रविवारी (दि.7) या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी या केबलची चोरी केली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.





