चीनच्या सहकार्याने श्रीलंकेत बांधलेला रेल्वेमार्ग खुला

कोलंबो – श्रीलंकेमध्ये चीनच्या सहकार्याने उभारण्यात आलेला नवीन रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हंबांनटोला प्रांतात सागरी किनारपट्टीवरील मातरा आणि बेलियाटा या दोन शहरांना जोडणारा हा रेल्वेमार्ग चीनच्या सहकार्याने उभारण्यात आला आहे. एकूण 26.75 किलोमीटरच्या या मार्गामुळे दक्षिण श्रीलंकेतील रेल्वेवाहतुक खूप सुकर होणार आहे.

या मार्गावर पहिल्यांदा 1948 साली रेल्वेमार्ग उभारण्यात आला होता. त्याला चीनच्या मदतीने जोड देण्यात आला आहे. या मार्गावर श्रीलंकेतील सर्वात लांब आणि दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब रेल्वे पूल आहे. 1.5 आणि 1.04 किलोमीटरचे हे दोन्ही रेल्वेपूल उभारण्यासाठीही चीनचे सहकार्य श्रीलंकेला लाभले आहे. श्रीलंकेच्या परिवहन आणि नागरी विमान वाहतुक मंत्री अर्जुन रणतुंगा यांच्या उपस्थितीत हा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या रेल्वेमार्गासाठी 278 दशलक्ष डॉलर खर्च आला आहे, असे चीनमधील शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)