अबब!

१. बीएसएनएल कंपनी तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तिच्या ताब्यातील जमिनीची विक्री करायचा निर्णय होऊ घातला असून तिची किंमत २०,००० कोटी रुपये होईल, असा अंदाज करण्यात आला आहे.

२. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीन महिन्यात (जून अखेर) भारतात सर्व वाहनांची विक्री एकत्र केली तर ती होते ६० लाख ८५ हजार ४०६. तरी ती गेल्या वर्षीच्यायाच तीन महिन्यातील एकूण वाहन विक्रीच्या तुलनेत १२.३५ टक्के कमी आहे. (गेल्या वर्षी ६९ लाख ४२ हजार ७४२)

३. महामार्गांवरज्या ज्या ठिकाणी हमखास अपघात होतात, असे‘ब्लॅकस्पॉट’ शोधून काढून तेथे विशेष दक्षता घेण्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कारण २०१६ साली देशात ४ लाख ८० हजार ६५२अपघात झाले आणि त्यात १ लाख ५० हजार ७८५ नागरिक मृत्युमुखी पडले तर ४ लाख ९४ हजार ६२४ नागरिक गंभीररित्या जखमी झाले होते.

४. प्रधानमंत्री जनधन ३६.०६ कोटी खात्यातील रकमेने एक लाख कोटी रुपयांच्या शिलकीचा टप्पा गेल्या ३ जुलै रोजी पार केला आहे.

५. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत जाऊन तपमान असेच वाढत राहिल्यास २०३० पर्यंत जगात २,४०० अब्ज डॉलरची हानी होईल, असा अंदाज आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)