#CWC19 : कांगारूंची शिकार करण्यास वाघ सज्ज

स्थळ- ट्रेट ब्रिज, नॉटिंगहॅम
वेळ- दुपारी 3 वाजता

नॉटिंगहॅम – माजी जगज्जेत्या वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का देणाऱ्या बांगलादेशचे पुढचे ध्येय आहे ते ऑस्ट्रेलियावर मात करण्याचे. त्यामुळेच येथे आज होणाऱ्या लढतीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे.

वेस्ट इंडिजविरूध्दच्या सामन्यात बांगलादेशने 322 धावांचे लक्ष्य 41.3 षटकात ब तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले होते. त्यांचा हा विजय क्रिकेट पंडितांसाठीही कमालीचा आश्‍चर्यजनक आहे.

शकीब अल हसन व लिट्टन दास यांनी केलेला धडाकेबाज खेळही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी मतीगंग करणारा आहे. आज त्यांच्यासाठी हे दोनही फलंदाज धोकादायक आहेत. शकीबने या स्पर्धेत दोन शतके टोलविली आहेत. या डावखुऱ्या फलंदाजाला बाद करणे ही कसोटीच असणार आहे.

ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, जेसन बेहनड्रॉफ, अलेक्‍स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कोल्टिअर नील, पॅट कमिन्स, नॅथन लायन, ग्लेन मॅक्‍सवेल, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, ऍडम झंपा.

बांगलादेश – मशरफे मोर्तझा (कर्णधार), लिट्टन दास (यष्टीरक्षक), तमीम इक्‍बाल, सौम्य सरकार, मुशफकीर रहीम, शकीब अल हसन, अबू जायेद, महमदुल्लाह, मेहंदी हसन मिर्झा, मोहम्मद मिथुन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसादेक हुसैन, मुस्ताफिझूर रेहमान, रुबेल हुसैन, सब्बीर रहमान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)