“नाणार’ रायगडला “जाणार’

मुंबई – राजापूर तालुक्‍यातील बहुचर्चित नाणार रिफानरी प्रकल्प आता रायगडमध्ये स्थलांतरित होणार हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तराने स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरामुळे राजापूरात धनदांडग्या गुंतवणूकदारांची घोर निराशा झाली असून त्यांचे अंदाजे 800 कोटी रुपये बुडणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

विधानसभेत आमदार नसीम खान यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात राजापूर तालुक्‍यातील नाणारचा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या चार तालुक्‍यातील एकूण 40 गावात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला स्थानिकांचा विरोध आहे का, असा सवाल केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.