नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला 30 मे पासून सुरुवात झाली. मोदी यांनी 58 मंत्र्यांचे सरकार स्थापन करून कामाला प्रारंभ केला आहे. यातच पहिल्या कार्यकाळात वारंवार विदेश यात्रा केल्याबद्दल टीकेचे धनी बनलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विदेश दौऱ्यांना सुरुवात केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते मालदीवच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालदीवनंतर उद्या नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या देशाला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रप्रमुख ठरतील.शेजाऱ्यांना प्राधान्य देण्याचं भारताचं धोरण आहे. या धोरणाच्या बळकटीसाठी हे दौरे महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जात आहे.