सोलापूर (भंडीशेगाव) – ज्ञानोबा माऊली, माऊली, माऊलीच्या जयघोषात टप्पा येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज बंधू भेटीने पालखी सोहळा भावविवश झाला. माळशिरस तालुक्यातुन पंढरपूर तालुक्यात माऊलींच्या पालखीन मंगळवारी प्रवेश केला. ठाकूर बुवा समाधी येथील रिंगणानंतर तोंडले येथे नंदाच्या ओढ्यावर माऊलींच्या पालखीने दुपारचा विसावा घेतला. त्यानंर संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानदेव या बंधू भेटीचा सोहळा टप्पा पार पडला.
दरम्यान, माऊलीचा सोहळा भंडीशेगाव येथे व तुकोबाराय यांची पालखी आज पिराचीकुरोली येथे मुक्कामी असणार आहे.