राफेल व्यवहार पर्रीकरांना मान्य नव्हता म्हणून त्यांनी संरक्षण मंत्री पद सोडले- शरद पवार

 

कोल्हापूर – राफेल व्यवहार प्रक्रिया मनोहर पर्रीकर यांना मान्य नव्हती म्हणूनच संरक्षण मंत्री पद सोडून ते गोव्यात आले, असा गौप्यस्फोट राष्त्रवादी कॉंग्रेसचे अध्य्क्ष शरद पवार यांनी कोल्हापूरातल्या पत्रकार परिषदेत केला. राहुल गांधीनंतर, आता प्रथमच मनोहर पर्रीकर यांच्याबाबत शरद पवार बोलले आहेत.

शरद पवार यांनी आज अनेक मुद्‌द्‌यांवर हात घातला. नरेंद्र मोदींनी कोणतीच आश्वासने पाळली नाहीत. लोकांची नाराजी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. देशातील संस्थांवर हल्ला होत आहे. त्या संस्था राजकीय कामासाठी वापरल्या जातात. शिवाय सर्वोच्च न्ययालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषदा घेतात ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. सैन्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये. हे सर्वांनी पाळले आहे. परंतु भाजप सरकार त्याला अपवाद आहे. ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी बोलतात. पण सैन्याचा वापर कोणत्याही पक्षाने राजकीय फायद्यासाठी करू नये असेही त्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील होत असलेल्या सभांचे सुद्धा यावेळी शरद पवार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. मोदी-शहा घातक आहेत हे ते सर्वांना सांगत आहे. जे चुकीचे चाललेय ते राज ठाकरे प्रभावीपणे मांडत आहेत. हे मांडत असताना ते आपल्या भाषणात उदाहरणांसह दाखवत आहेत आणि ते अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यांच्या सभांचा फायदा होईल, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे आणि आम्ही निवडणुकीत एकत्र नाही, पण राज्य चुकीच्या लोकांच्या हातातून काढून घेण्यासाठी सर्वांची मदत घेणार. याबाबत अद्याप कोणता प्रस्ताव नाही. मोदींनी निश्‍चित काय केले हे त्यांना माहिती नाही.

मोदींना गांभीर्याने घेण्याची गरज नाही त्यामुळं लोक बदल करण्याचा मनःस्थितीत आहेत. भाजपा आणि सेनेच सरकार नको अशी लोकांची मनस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत सातत्य होत ते आज राहीले नसल्याचेही यावेळी शरद पवारांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)