नवी दिल्ली – देशाची राजधानीमध्ये नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्ज माफियांविरोधात मोठी कारवाई केली आहे. दिल्लीच्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोन किलो हेरॉइनसह 1800 किलो स्यूडोफेड्राइन (Pseudoephedrine) नावाचा देखील ड्रग्ज साठा जप्त केला आहे. माहितीनुसार, नारकोटिक्स विभागाने शुक्रवारी रात्री गुप्त माहिती प्राप्त केली, ज्याच्या आधारावर अधिकार्यांनी ही मोठी कारवाई केली.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी एनसीबी 3 आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी करणार्यांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, जो संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. त्याची सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 400 करोड रुपये एवढी किंमत आहे. त्यामुळे नारकोटिक्स विभागाच्या या कारवाईकडे एक मोठे यश म्हणून पाहिले जात आहे.