दुमका – झारखंड मध्ये सन 2017 साली एका 19 वर्षीय युवतीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात स्थानिक न्यायालयाने 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या सर्व आरोपींना एकूण 2 लाख 97 हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या आरोपींनी दुमका जिल्ह्यातील दिघी गावात या मुलीवर 6 सप्टेंबर 2017 रोजी सामुहिक बलात्कार केला होता.
या मुलीने बिगर अदिवासी युवकाबरोबर प्रेम केल्याने आरोपींनी तिच्याकडून पैसे आणि मोबाईल फोन वसुल केला होता आणि त्यांनतर शिक्षा म्हणून त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता. ही मुलगी आपल्या मित्राबरोबर त्या दिवशी फिरायला गेली होती. सिधो कान्हु मुरमु विद्यापीठाच्या दिघी येथील परिसरात आरोपींनी या दोघांना घेरून तिच्या मित्रांची पिटाई करून त्याला पळवून लावले आणि नंतर त्यांनी तिच्यावर हा र्अत्याचार केला.