निरीक्षण : इस्त्रायल संघर्ष आणि उत्कर्ष

माधव श्रीकांत किल्लेदार

लिस्टाईनकडून पराभूत झालेल्या ज्यू समाजात त्याकाळी राजसत्तेचा उदय न झाल्याने त्यांच्यात स्वाभाविकपणे देवाची पूजाअर्चा आणि उपासना करणारे धार्मिक प्रवृत्तीचे लोक हे सर्वांना संकटकाळी आधार वाटायचे. ह्या सत्प्रवृत्ती असलेल्याच लोकांनी ज्यूंचे मनोधर्य टिकवले आणि पुन्हा त्यांना गतवैभव प्राप्त करून घेण्यास प्रेरणा दिली.

मोझेसच्या कुळातील सॅम्युअल हा शिलोहच्या मंदिरातील एक पुजारी होता. त्याला ज्यूंचा पराभव आणि पवित्र आर्कची झालेली दुर्दशा सहन झाली नाही. त्याने सॉल ह्या वीरपुरुषास प्रेरणा दिली. सॉलने अमोना इटांची इस्रायली लोकांवर होणारी चढाई थांबवली आणि त्यांना पिटाळून लावले. त्यावेळी सॉलचा रणावेश पाहून इस्राईल लोकांना स्फुरण चढले आणि त्यांनी त्याला “”राजा” म्हणून घोषित केले.

इस्त्रायली लोकांच्या राजसत्तेची ही खऱ्या अर्थाने सुरुवात होती. ह्या प्रचंड अस्थिर राजकीय वातावरणात ज्यूंमधील अंतर्गत कलह सुरूच होते. त्यात भर पडली होती ती परकीय आक्रमकांची! त्यामुळे त्यानंतर झालेल्या युद्धात सॉल आपल्या दोन्ही मुलांसह मृत्यूमुखी पडला. या घटनेनंतर नेतृत्वहीन असलेला ज्यू समाज हा अंधारात चाचपडत होता. त्यानंतर ज्यू समाजात डेव्हिड नावाचे एक नेतृत्व उदयास आले. परंतु अंतर्गत लांच्छनास्पद कटकटी आणि लाथाळ्या त्या काळी सुद्धा असत आणि त्यांना तोंड देत प्रसंगी वनवास पत्करून भूमिगत राहून शत्रूशी अविरतपणे झुंज देण्याचे सामर्थ्य डेव्हिडनं प्रकट केलं आणि शत्रूला जेरीस आणलं त्याच्या प्रभावी नेतृत्वामुळे इस्त्रायली लोकांना कितीतरी वर्षाच्या पारतंत्रातून मुक्‍तता मिळाली. त्यानंतर डेव्हिडने जेबूस म्हणजेच आजच्या काळातील “”जेरूसलेम” हे बळकट ठाणं जिंकून घेतलं आणि आपल्या नव्या राजधानीची उभारणी केली. त्याकाळी जेबूस हे ठाणे एखादा आंधळा पांगळा मनुष्य देखील सहजपणे जिंकू शकेल असे म्हटले जायचे. पण डेव्हिडने त्या गडावर स्वत:चे राजसिंहासन प्रस्थापित केलं.

अशा प्रकारच्या विजयाची खात्री ही डेव्हिडला नव्हती. म्हणून ही ईश्‍वराची कृपा असावी असे त्याला वाटले आणि ज्यूंची पवित्र “आर्क’ त्याने वाजतगाजत राजधानीत आणली. त्या मिरवणुकीत त्याने ईश्‍वराचा जयजयकार करत नृत्य केलं आणि विजयोत्सव साजरा केला. तो विजयोत्सव त्याने राष्ट्रीय उत्सव समजून लोकांना धन वाटले आणि मूल्यवान वस्तूंचे वाटप केले.
पुढे जाऊन आपण ह्या राजधानीत एका भव्य मंदिराची स्थापना करावी असा विचार डेव्हिडच्या मनात डोकावू लागला. ज्यूंच्या दृष्टीने त्या विजयी घटनेत विकासोन्मुख समाजाला आवश्‍यक असणाऱ्या धर्म आणि राजकारणाची सुयोग्य मांडणी घालून दिली.

ह्यानंतर डेव्हिडने संपूर्ण कनान आपल्या अधिपत्याखाली आणला. सॉला हा प्रचंड प्रराक्रमी होता. पण डेव्हिडमध्ये युद्धकौशल्य आणि राजकीय चातुर्य होतं. डेव्हिड हा त्याच्या आणि त्याच्या राज्याच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या व्यक्‍तीचे वा शत्रूचे “एक घाव दोन तुकडे’ करत त्यास संपवत असे. इजिप्तपासून युफ्रेटिपसर्यंत असलेल्या त्याच्या सत्तेकडे वक्र दृष्टीने पाहणारी संघटित शक्‍ती त्याने उरू दिली नाही. त्याने इडोमाईट, अमोनाईट, सिरियन लोकांना लोळवलं. त्या काळात त्याचे सैन्य अतिशय सक्षम होते आणि त्यात जोब, बेनाइया ह्या नामवंत योद्धाचा समावेश होता. डेव्हिडच्या समर्थ नेतृत्वामुळेच अनेक दूरवरच्या प्रदेशांशी इस्त्रायली लोकांचा व्यापार वाढू लागला. तसेच इस्त्रायली लोकांमधील मतभेद पूर्णत: नष्ट होऊ लागले आणिआत्मियतेची भावना वाढीस लागली. त्याने त्याच्या राज्यात जनगणना केली होती आणि त्यात त्याकाळी ज्यूंची संख्या 13 लक्ष होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)