बाईकर्ससाठी बंगळुरु येथे टी-20 शैलीची चॅम्पिनशिप

बंगळूरु – एफएमएससीआय भारतीय राष्ट्रीय रॅली स्प्रिंट अजिंक्‍यपद (टू डब्ल्यु) स्पर्धेच्या पहिल्याच सत्राला बंगळूरु येथे सुरुवात होणार आहे. देशातील विविध भागातून या नवीन फॉरमॅटच्या स्पर्धेत 120 हून अधिक आघाडीचे बाईकर्स सहभागी होणार आहेत.

मोटरस्पोर्टस करण्यात येणा-या प्रयोगात 6.2 किलोमीटरच्या अंतरामध्ये बाईकर्सना आपले कौशल्य दाखवायचे आहे. बंगळूरुचे विश्‍वास व युवा कुमार, पुण्याचे जतीन क्‍मार आणि मुंबईचे बादल जोशी या सर्व बाईकर्समध्ये आपल्याला चांगली चुरस पहायला मिळेल.

आयएनआरएससीने टी-20 सामन्याच्या धर्तीवर या स्पर्धेचे नियोजन केले असून मोटरस्पोर्टस आयएनसी याला प्रमोट करत आहे. रायडर्स व प्रेक्षकांना लक्ष्य ठेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या वर्षीच्या चॅम्पियनशिपमध्ये सहा फेरी असतील. यामध्ये चेन्नई, मंगळूरु, पुणे, गोवा या इतर शहरांचा देखील सहभाग असेल. बंगळूरुला स्पर्धेची पहिली व शेवटची फेरी पार पडेल.

या स्पर्धेसाठी एकूण आठ श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये अ गटात 800 सीसीपर्यंत, ब गटात 1300 सीसीपर्यंत, ब गट 131 सीसी ते 165 सीसी, ब गट 166 सीसी ते 260 सीसी, ब गट 261 सीसी ते 400 सीसी, महिलांसाठी 260सीसी पर्यंत, स्कूटर श्रेणी व बुलेट श्रेणी अशा श्रेणींचा सहभाग असेल.

मोटरस्पोर्टस आयएनसीचे संस्थापक जय दास मेनन यांनी चॅम्पियनशिपला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भारतातील दुचाकी रेससाठी ही क्रांती असल्याचे ते म्हणाले. स्पर्धकांचा आकडा पाहता मी समाधानी आहे. जर तुम्ही योग्य व्यासपीठ द्यायाल तर, युवक त्याला पुढे येऊन चांगला प्रतिसाद देतात असे मेनन पुढे म्हणाले. आठ मुख्य श्रेणींव्यतिरिक्त हौशी रायडर्स देखील नॉन-चॅम्पियनशिप श्रेणी असलेल्या द स्टार ऑफ कर्नाटक (2/4 स्ट्रोक ते 260 सीवी ब गट) या श्रेणीत आपले नशीब आजमावू शकतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)