#CWC19 : अँजेलो मॅथ्यूजची शतकी खेळी; भारतासमोर 265 धावाचं लक्ष्य

लीड्‌स – सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज अँजेलो मॅथ्यूजच्या शतकी आणि लाहिरू थिरिमाने याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने भारतीय संघासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 264 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीलंकेने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. भारतीय संघाच्या गोलंदाजानी 11.4 षटकांतच 4 बाद 55 अशी श्रीलंकेची अवस्था केली होती. मात्र, त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजच्या आणि लाहिरू थिरिमाने यांनी श्रीलंकेचा डाव सावरला. अँजेलो मॅथ्यूजने 128 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 113 धावांची खेळी केली तर लाहिरू थिरिमाने याने 53 धावा करत त्याला मोलाची साथ दिली. त्यानंतर धनंजय डी सिल्वा याने नाबाद 29 धावा करत श्रीलंकेची धावसंख्या 264 पर्यंत नेली.

भारतीय संघाकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 10 षटकांत 37 धावा देत 3 गडी बाद केले. तसेच बुमराहने एकदिवसीय कारकीर्दीत 100 गडी बाद करण्याचा देखील आकडा पूर्ण केला. हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक- श्रीलंका 50 षटकांत 7 बाद 264 (अँजेलो मॅथ्युज 113, लाहिरु थिरीमाने 53, जसप्रीत बुमराह 3-37, भुवनेश्‍वर 1-73, हार्दिक पांड्या 1-50, रवींद्र जडेजा 1-40, कुलदीप यादव 1-58)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)