‘जियेंगे तो, और लढेगें’ – जयंत पाटील

मुंबई – महाराष्ट्राचे वैभव परत आणण्यात यशस्वी ठरलो,’ असे सांगतानाच “पुढच्या सरकारमध्येही मी पुन्हा येईल. याच निर्धाराने, याच भूमिकेत, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, असे काव्यात्मक पंक्तीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्धार व्यक्त केला. तर “जियेंगे तो और भी लढेंगे,’ असा टोला यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी लगावला.

आगामी सभागृहात कोण येणार, कोण नाही येणार याचे उत्तर शेवटी राज्यातील जनताच देणार आहे. महाराष्ट्रातील जनतेवर आमचा पूर्ण विश्‍वास आहे. ती चांगल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवू शकते आणि चांगला मुख्यमंत्री शोधूही शकते. त्यामुळे जियेंगे तो और भी लडेंगे असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)