धाडस असेल तर राज ठाकरेंच्या घरावर छापे घालून दाखवा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाजपला आव्हान

मुंबई – भारतीय जनता पक्षात धाडस असेल तर त्यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरावर छापे घालून दाखवावे असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला दिले आहे. राज ठाकरे यांच्या सभांना आक्षेप घेत भाजपने त्यांच्या संबंधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हे आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभेची निवडणूक लढवत नाही. त्यामुळे त्यांच्या सभांचा खर्च कोणाच्या खर्चात धरला जातोय असा सवालही भाजपकडून उपस्थित केला जात आहे.

राज ठाकरे यानी नांदेड, सोलापुर आणि कोल्हापुर येथे जाहीरसभा घेऊन मोदी-शहा या जोडगोळीला पराभूत करण्याच आवाहन लोकांना केले.आहे. आता सातारा, बारामती आणि पुणे इत्यादी ठिकाणीही त्यांच्या सभा होणार आहेत. त्या संबंधात नवाब मलिक म्हणाले की सन 2014 च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपचा प्रचार केला होता पण आता ते त्यांच्या विरोधात प्रचार करीत असल्यानेच त्यांच्या सभांवर आक्षेप घेतला जात आहे असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)