सागर जिल्ह्यात मालगाडी घसरल्याने वाहतूक विस्कळीत

जबलपुर – मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात मकरोनिया स्टेशन जवळ आज पहाटेच्या सुमाराला एक मालगाडी रूळावरून घसरल्याने या भागातील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. तथापी या मार्गावरील डाऊन साईडची वाहतूक मात्र सुरळीत ठेवण्यात रेल्वे अधिकारी यशस्वी झाले होते.

दुसऱ्या बाजुची वाहतूक पुर्ववत करण्यासाठी रेल्वेची यंत्रणा तेथे तातडीने सक्रिय करण्यात आली होती. या घटनेमुळे बिना-दामोह पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली. बिलासपुर-भोपाळ आणि भोपाळ बिलासपुर या दोन्ही मार्गाने धावणाऱ्या रेल्वे गाड्या मजगवान फाटा मार्गावरून अन्यत्र वळवण्यात आल्या. या दुर्घटनेत कोणी दगावल्याचे वृत्त नाही. रूळावरून घसरलेले मालगाडीचे डबे त्या मार्गावरून हलवण्यासाठी क्रेस सारखी अवघड यंत्रसामग्री तेथे आणण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.