#ICCWorldCup2019 : ऋषभ पंतला विश्‍वचषकासाठी वाट पहावी लागणार

मुंबई – इग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. दुसरा यष्टीरक्षक आणि चौथ्या क्रमांकासाठी कोणाला संधी मिळणार? याकडे संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष होते. चुरशीच्या स्पर्धेमध्ये अनुभवी दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली असून ऋषभ पंतची निवड केली गेली नाही.

मागील काही महिन्यांपासून आपल्या फलंदाजीने प्रभावित करणाऱ्या पंतला विश्‍वचषक स्पर्धेचे तिकीट मिळाले नसल्याने त्याचे चाहते नाराज आहेत. अल्पावधीतच आपल्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणातील कौशल्यामुळे सर्वांची मन जिंकलेल्या ऋषभ पंतला त्याच्या यष्टीरक्षणातील त्रुटींमुळे संघात स्थान दिले गेले नाही असे प्रसाद यांनी नमूद केले. त्यामुळे विश्‍वचषक स्पर्धा खेळण्यासाठी पंतला 2023 पर्यंत वाट पहावी लागणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)