“साहो’त प्रभास-श्रद्धाचा रोमांस

तेलुगू सुपरस्टार प्रभासच्या “बाहुबली’ला मिळालेल्या यशानंतर आगामी “साहो’ चित्रपटाची प्रेक्षक खुपच उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर रोमांस करताना दिसणार आहे. या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदाच झळकणार असून चित्रपटातील एक स्टिल फोटो ऑनलाइन व्हायरल झाला आहे.

या फोटोत प्रभास आणि श्रद्धा खूपच रोमॉंटिक मुडमध्ये दिसून येत आहे. तसेच या मल्टी-स्टारर चित्रपटात प्रभास आणि श्रद्धाशिवाय जॅकी श्रॉफ, नील नितिन मुकेश, मुरली शर्मा, अरुण विजय, एवलिन शर्मा, चंकी पांडे, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर यासारख्ये दिग्गज कलाकारांची मायंदळी आहे.

दरम्यान, “साहो’ चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून शूटिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हॉलिवूडमधील “ट्रान्सफॉर्मर’ चित्रपटाचे प्रसिद्ध स्टंट डायरेक्‍टर कॅनी बेट्‌स यांनी या चित्रपटातील ऍक्‍शन सीन्स डायरेक्‍ट केले आहेत. या चित्रपटासाठी प्रभासने खूपच मेहनत आणि कमिटमेंट पाहता कॅनी खूपच खूष आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची तयारी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.