मी जेलमध्ये जाऊनही कर्ज फेडेल, पण जेटला वाचवा – मल्ल्या 

नवी दिल्ली – फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याने आर्थिक नुकसानीचा सामना करत असलेल्या प्रायव्हेट एयरलाइन्स जेट एयरवेजला मदत मिळत नसल्याने दु:ख व्यक्त केले आहे. मल्ल्याने आज ट्विट करत पुन्हा आपला प्रस्ताव मांडला आहे. मी बँकांचे सर्व कर्ज फेडण्यास तयार असून भारतीय जेलमध्ये जाऊनही कर्ज फेडेल, असे त्याने म्हंटले आहे.

विजय मल्ल्याने म्हंटले कि, मी किंगफिशरमध्ये भरपूर गुंतवणूक केली आहे. यामुळे ती भारतातील सर्वात मोठी आणि अनेक पुरस्कार प्राप्त करणारी कंपनी बनली आहे. यासाठी किंगफिशरने सरकारी बँकाकडून कर्ज घेतले होते. मी शंभर टक्के कर्ज फेडण्याचा प्रस्ताव याआधीही दिला आहे. परंतु, त्याऐवजी मला दोषी घोषित करण्यात आले.

सरकारी बँकांचे शंभर टक्के कर्ज फेडण्यास तयार असल्याचे मी नेहमीच म्हणतो. परंतु, भारतीय माध्यमे म्हणत आहे कि, मला युकेमधून भारतात प्रत्यार्पणची भीती आहे. मी कोणत्याही पद्धतीने कर्ज फेडण्यास तयार आहे मी युकेत असो कि भारतीय जेलमध्ये.

जेट आणि किंगफिशर जरी एकमेकांचे स्पर्धक असले तरीही एका मोठ्या एयरलाइन्सला अपयशाच्या मार्गावर पाहून दुःख होते आहे. सरकारने एयर इंडियाला वाचविण्यासाठी ३५ हजार कोटी सार्वजनिक पैशांचा वापर केला होता. केवळ पीएसयू असल्याने भेदभाव करण्याचे कारण नक्कीच नाही.

https://twitter.com/TheVijayMallya/status/1118283962923782146

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)