राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये अवकाळी पावसाचे ३५ बळी 

नवी दिल्ली – देशातील अनेक भागांमध्ये सध्या वादळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. विशेषतः राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजराला पावसाने अगदी झोडपून टाकले आहे. सोमवारी आणि मंगळवारी (१६ एप्रिल) झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत ३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

मध्यप्रदेशमध्ये वादळी पावसामुळे १६ जणांचा मृत्यू झाला. तर राजस्थान आणि गुजरातमध्ये सुद्धा काही लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे आणि इतर मालमत्तेचे भारी नुकसान झाले आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी हवामान विभागाने हाय-अलर्ट जारी केला आहे. मध्यप्रदेशातली झाबुआ येथे अचानक हवामानाध्ये बदलझाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला असून, यामध्ये अनेक जण जखमी झाले आहे. तर, दुरीकडे उदयपूरमध्ये विजेचे जवळपास ८०० खांब आणि ७० ट्रान्सफॉर्मर कोसळले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.