पावसामुळे मुंबई, उपनगर व ठाणे जिल्ह्यात सुटी जाहीर

मुंबई : सोमवार सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईमध्ये सगळीकडे पाणीच पाणी साचून राहिले आहे. यामुळे महानगरीतील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आणि उपनगरी लोकल उशीरा धावू लागल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 2, 4 आणि 5 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईतील काही ठिकाणी आज आणि मंगळवारी अतिशय जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्‍यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे.

फोटोगॅलरी : पावसामुळे मुंबई तुंबली! रस्त्यांना आले तलावाचे रुप

दरम्यान, मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागस भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबईतील पावसाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here