नवी दिल्ली -सारधा चिट फंड घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्यामध्ये हात असल्याचा आरोप असलेले कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची परवानगी मागणारी याचिका सीबीआयने सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली होती. आता सर्वोच्च न्यायालयातर्फे सीबीआयद्वारा करण्यात आलेल्या मागणीवर उद्या सुनावणी करण्यात येणार आहे.
या प्रकरणातील आधीच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयातर्फे सीबीआयच्या या मागणीबाबतचा आपला निर्णय राखून ठेवला आला होता.
आतापर्यंत या प्रकरणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या असून यापूर्वी कोलकाता शहर पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देत न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना धक्का दिला होता. पण त्याचवेळी त्यांना अटक करता येणार नाही, असे सांगत दिलासाही दिला होता.
चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांनाच तेथील पोलिसांनी पोलीस ठाण्यात घेवून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पश्चिम बंगाल सरकार आणि सीबीआयमधील वादावर सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार यांना अटकेपासून संरक्षण दिले होते.
Supreme Court order tomorrow on a plea of CBI seeking permission for custodial interrogation of former Kolkata Police Commissioner, Rajeev Kumar over his alleged role in destroying evidence in Saradha chit fund case. pic.twitter.com/VY2xKDhz1o
— ANI (@ANI) May 16, 2019