दिल्ली सरकारचे गिफ्ट; बस, मेट्रोमध्ये महिलांना मोफत प्रवास 

नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आप सरकारने महिलांना दिल्ली मेट्रो आणि डीटीसी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची भेट दिली आहे. केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत यासंबंधी घोषणा केली. दरम्यान, हा निर्णय लागू होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

अरविंद केजरीवाल यांनी म्हंटले कि, दिल्लीमध्ये महिलांच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना आहे. दिल्ली सरकारने महिलांना बस आणि मेट्रोमधील प्रवास निशुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार त्यांना सार्वजनिक वाहन वापरण्यास प्रोत्साहन मिळेल. महिलांना निशुल्क प्रवास देण्यासाठी डीएमआरसीचे होणारे नुकसान भरपाई दिल्ली सरकार देईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महिलांच्या सुरक्षेसाठी चौकाचौकात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरपर्यंत सीसीटीव्ही लावण्याचे काम पूर्ण होईल, अशीही माहिती केजरीवाल यांनी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)