#ICCWorldCup2019 : विराट कोहलीचा अंगठा दुखावला

लंडन – भारतीय संघ पाच तारखेला विश्‍वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सरवादरम्यान जखमी झाला आहे. शनिवारी सराव करताना विराट कोहलीच्या आंगठ्याला दुखापत झाली आहे.

सरावादरम्यान विराट कोहलीच्या आंगठ्याला दुखापत झाली. जवळच असलेले संघाचे फिजिओ पॅट्रीक फराहत यांनी तात्काळ उपचार केले. पॅट्रीक फराहत यांनी विराटच्या आंगठ्यावर स्प्रे मारुन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर कोहलीने सराव अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला. संघ व्यवस्थापनातर्फे विराट कोहलीच्या दुखापतीबद्दल अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

विराट कोहलीची दुखपत किती गंभीर आहे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधाराला दुखापत झाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. विजय शंकर दुखापतीतून सावरला आहे. तर केदार जाधवची अजूनही दुखापतीतून सावरत आहे. त्यातच कोहलीला झालेली दुखापत म्हणजे भारतासाठी मोठी चिंतेची बाब आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.