मुंबई – केंद्र सरकार दर महिन्याला घरगुती गॅस सिलेंडरचे दर जाहीर करत होते. त्यामुळे दर महिन्याला गॅस सिलेंडरची किंमत बदलत असून, त्यामागील अनुदानात देखील बदल होते. आठशे रुपयांच्या सिलिंडरचे साधारण दोनशे रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या आधारकार्डला जोडलेल्या बँक खात्यात जमा होत असे.
सध्या अनुदानित आणि विना अनुदानित स्वयंपाक गॅस सिलिंडरची (एलपीजी) किंमत जवळपास सारखीच आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे अनुदान जमा होत नसल्याचा दावा गॅस वितरक आणि पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला.
केंद्र सरकारने जून 2020 पासून घरगुती स्वयंपाक गॅस सिलिंडरची आधारभूत किंमत 579 पर्यंत खाली आणली आहे. त्यानंतर गॅसच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, गॅस सिलिंडरचा दर पुन्हा एकदा वाढल्यास ग्राहकांच्या खात्यात अनुदान जमा होईल अशी पुस्ती गॅस वितरक आणि पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जोडली.
सध्या अनुदानित आणि विना अनुदानित घरगुती गॅसच्या किंमतीत फारसा फरक राहिला नसून, आता सिलिंडरमध्ये केवळ पंधरा ते वीस रुपयांची तफावत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अनुदान जमा होत नाही असं काही गॅस वितरक संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.