गांधींच्या मारेकऱ्यांचा विजय झाला -दिग्विजय सिंह

नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या उमेदवारांपैकी एक असलेल्या भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहे. भोपाळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा भाजपच्या उमेदवार प्रज्ञा साध्वी यांनी पराभव केला आहे. यानंतर दिग्विजय सिंह यांनी या निकालावर नाराजी व्यक्त  करत  ‘हा महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचा विजय झाला.’ अशी प्रतिक्रिया पराभवानंतर दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणत भाजपा उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी देशभरात एकच खळबळ माजवली होती. याआधी देखील अनेक विवादित व्यक्तव्यांमुळे प्रज्ञा सिंह ठाकूर चर्चेत राहिलेल्या होत्या. अशातच भोपाळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पराभव केला. यावर दिग्विजय सिंह यांनी पराभवनंतर प्रतिक्रिया व्यक्त केली असून ते म्हणतात, ‘आज देशात गांधींच्या विचारसरणीचा पराभव झाला आहे तर गांधींच्या मारेकऱ्यांचा विजय झाला आहे’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here