पुणे – मार्केटयार्डातील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दि पुना मर्चंटस चेंबरची निवडणूक 4 वर्षांनी लागली आहे. सन 2019-21 या द्विवार्षिक कालावधीची निवडणूक येत्या 18 जुलै रोजी होणार आहे. 15 जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
यापूर्वीच्या दोन द्विवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. यावेळीही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यामध्ये यश न आल्याने अखेर निवडणूक होणार आहे. चेंबरचे विद्यमान अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांच्यासह बहुतांश पदाधिकारी, संचालक आणि नव्याने अर्ज दाखल केलेले काहीजण निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून ऍड. सुभाष किवडे, ऍड. हरिभाई गुजराथी आणि कार्यालयीन सचिव विजय दामले काम पाहात आहेत.