जामखेड – जामखेड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 च्या पोटनिवडणुकीत आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवार रिंगणात राहिले. प्रभाग क्रमांक 14 च्या नगरसेविका व उपनगराध्यक्षा फरिदा आसिफ खान यांचे नुकतेच निधन झाले आहे. रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. रोहिनी संजय काशीद (शिवसेना), छाया संतोष गुंदेचा (अपक्ष), जकिया आयुब शेख (भाजप), परवीन सिराजोद्दीन शेख (कॉंग्रेस), मैनाबाई ज्ञानदेव सदाफुले (अपक्ष ) या पाचजणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही.