फडणवीसांनी नोंदविला नवा विक्रम

1972नंतर पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारे ठरले एकमेव मुख्यमंत्री

नागपूर, दि. 4 – राज्याचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी नवा विक्रम केला आहे. मुख्यमंत्रिपदाची पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारे 1972 नंतरचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. (आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.) 1972 नंतर एका नेत्याने सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे.

दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 11 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यामध्ये वसंतरावांनी पाच वर्षांची एक सलग टर्म पूर्ण केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच 5 सलग वर्ष विधिमंडळाचे नेते राहू शकले आहेत. फडणवीस हे राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्रीदेखील आहेत.

मुख्यमंत्री होणे आणि पद टिकवण्यासाठी फडणवीसांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर फडणवीसांना पक्षातील आणि पक्षाबाहेरची मोठी आव्हाने होती. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी काही आमदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांना पक्षातील जुने नेते एकनाथ खडसे यांची महत्त्वकांक्षा, शेतकरी आंदोलनाची तीव्रता, मराठा आंदोलनाचे आवाहन, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ते पंढरपूरच्या विठ्ठल पूजेला जाऊ न शकणे इथपर्यंत बरीच आव्हाने पेलावी लागली होती. तरिही फडणवीस टिकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)