लंडन – लॉर्डस मैदानाने 1983 मध्ये क्रिकेट क्षेत्रास नवा विश्वविजेता दिला होता. त्यावेळी भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवत सनसनाटी विजेतेपद मिळविले होते. आज पुन्हा येथे नवा विश्वविजेता संघ दिसणार आहे. आजपर्यंत अजिंक्यपदाच्या उंबरठ्यावरून पराभव पत्करणारे इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत होणार आहे. या लढतीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे.
दरम्यान, आमचा संघ विश्वविजेता होत नाही, अशी टीका करणाऱ्यांना आज आमच्या सर्वोच्च कामगिरीद्वारे उत्तर मिळणार आहे, असं इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने म्हटलं आहे.
“आमचा संघ विश्वविजेता होत नाही, अशी टीका करणाऱ्यांना आज आमच्या सर्वोच्च कामगिरीद्वारे उत्तर मिळणार आहे. अंतिम फेरीत स्थान मिळविल्यानंतर आमचे खेळाडू अजिंक्यपद मिळविण्यासाठी अधीर झाले आहेत. आम्हाला आतापर्यंत पाठिंबा देणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांना आम्ही निराश करणार नाही.”
-इऑन मॉर्गन , इंग्लंड कर्णधार